अभिनेता Salman Khan देणार यांना तिकीट तो बॉलीवूड | Salman Khan News | Lokmat News

2021-09-13 126

विश्वसुंदरीचा मान मिळाल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते मानुषीला लॉन्च करण्यासाठी तयार आहेत. आत्तापर्यंतचा मानुषीचा प्रवास पाहता अनेक निर्मात्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स देखील दिल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची सलमान खानची इच्छा असून होम प्रोडक्शनच्या चित्रपटातून तो मानुषीला लॉन्च करू शकतो. सलमान खान नेहमीच तरुण कलाकारांना लॉन्च करत असतो. सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, डेझी शाह, जरीन खान, स्नेहा उलाल सारख्या अनेक अभिनेत्रींना त्यानं बॉलिवूडची दारं खुुली करून दिली आहेत. हे सगळं खरं असलं तरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा मानुषीचा कोणताच विचार नसून, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. मेडिकलची विद्यार्थिनी असलेली मानुषी बॉलिवूडऐवजी स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मासिकपाळी आणि स्वच्छता याबाबत तिला काम करण्याची इच्छा आहे. त्याला ती प्राधान्य देणार आहे. त्यामुळं ती सलमानची ऑफर स्विकारते का, या बद्दल उत्सुकता वाढली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires